Home Breaking News पुणे: रामटेकडी परिसरात ‘गुंड’ राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून; पैशांच्या वादातून...

पुणे: रामटेकडी परिसरात ‘गुंड’ राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून; पैशांच्या वादातून हाणामारी.

57
0
Raju Shivsharan, 36, a resident of Ramtekdi, Hadapsar.

पुणे: दारूसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी एका गुंडाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रामटेकडी परिसरातील वंदे मातरम् चौकात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

राजू शिवशरण (वय 36, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात राजू शिवशरण याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.

निखिल कैलास चव्हाण (वय 16, रा. वंदे मातरम् चौक, रामटेकडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशरण, महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी, दुर्गेश गायकवाड हे सर्व एकमेकांच्या परिचयाचे होते. शुक्रवारी मध्यरात्री दारू पिल्यानंतर ते वंदे मातरम् चौकात थांबले होते. त्या वेळी मुलांनी राजूला दारूसाठी पैसे मागितले. त्याने नकार दिल्यावर वाद सुरू झाला. शिवशरणने शिवीगाळ केल्याने संतापलेल्या मुलांनी त्याला दगड, विटा, सिमेंटचे तुकडे आणि हातपायांनी मारहाण सुरू केली. त्यातील एकाने शिवशरणच्या डोक्यावर दगड ठेवला, तर दुसऱ्याने त्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. फिर्यादीचे काका वाचवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीलाही महेश शिंदेने बाटलीने मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवशरणला पोलिसांनी ससून रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

उपआयुक्त आर. आर. राजा यांनी सांगितले की, वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शिवशरणच्या पुतण्याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 118 (1), 115 (2), 126 (2), 189 (1), 189 (2), 191 (2), 190, आणि 352 अंतर्गत सात अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या मुलांना कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे निरीक्षण गृहात नेले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here