Home Breaking News शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे करोडो रुपये स्वाहा

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे करोडो रुपये स्वाहा

45
0

मुंबई : शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशांतगर्त शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात झाली, पण दिवसाच्या व्यापार सत्रात वरच्या स्तरावरून प्रचंड घसरण झाली. विशेष म्हणजे केवळ भारतीय शेअर बाजारच नव्हे, तर आशियातील सर्व शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. शुक्रवारच्या सत्रातील मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग दरम्यान शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC, एल अँड टी, आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली ज्याचा प्रभाव संपूर्ण बाजारावर दिसून आला.

शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात तब्बल २.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसई सेन्सेक्स ३० अंकांनी घसरून ७३२.९६ अंक घसरून ७३,८७८.१५ अंकांवर क्लोज झाला. घसरण विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) मोठ्या प्रमाणात नफावसुली आणि विक्रीमुळे मार्केटमध्ये पडझड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here