Home Breaking News जागृत नागरिक महासंघाचं सामाजिक बांधिलकीचं दर्शन; मावळमधील आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा किट...

जागृत नागरिक महासंघाचं सामाजिक बांधिलकीचं दर्शन; मावळमधील आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा किट वाटप!

25
0

पिंपरी-चिंचवड – जागृत नागरिक महासंघ ही केवळ माहिती अधिकाराच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारी संस्था नसून, सामाजिक बांधिलकी जपणारी चळवळीची ताकद ठरत आहे. संस्थेने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले आहे. नुकत्याच आयोजित उपक्रमात मावळ तालुक्यातील ताजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या गोरगरीब आणि गरजू आदिवासी कातकरी कुटुंबांना मोफत किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामागचा हेतू फक्त साहित्य वाटप नसून, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा होता. आजही डोंगराळ व दुर्गम भागात मूलभूत गरजांसाठी संघर्ष करणाऱ्या आदिवासी कुटुंबांसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरला.

कार्यक्रमावेळी ताजे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताराबाई केदारी, उपसरपंच रेश्मा गायकवाड, ग्रामस्थ व पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचा प्रतिसाद आणि कृतज्ञता मन हेलावून टाकणारी होती.

या प्रसंगी जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माहिती अधिकार हा फक्त कागदपत्रांपुरता मर्यादित नाही, तर तो एक क्रांतिकारी हत्यार आहे. गरजूंना त्याचा योग्य वापर करून न्याय मिळवून देण्यासोबत, त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळवून देण्याचंही काम आमची संस्था करत आहे.”

भाजपाचे मावळ तालुका सचिव मच्छिंद्र मारुती केदारी यांनीही संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत म्हटलं की, “माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणणं हे खूप मोठं काम आहे, आणि नितीन यादव व त्यांच्या टीमचं हे योगदान खरोखर कौतुकास्पद आहे.”

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रस्तावना मावळचे समन्वयक सुनील गुजर यांनी केली. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाचे सचिव उमेश सणस, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, शहर प्रमुख अशोक कोकणे, खजिनदार रोहिणी यादव, तसेच राजू डोगीवाल, प्रकाश गडवे, प्रकाश पाटील, राजेंद्र कदम, ओंकार भागवत आदींनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे आणि आशेचे हास्य, संस्थेच्या कार्याचे खरे यश ठरले. समाजसेवा ही फक्त बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता कृतीतून सिद्ध करणाऱ्या जागृत नागरिक महासंघच्या या कार्यामुळे सर्वत्र स्तुतिसुमने उधळली जात आहेत.

Previous articleराज्याचे नवे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचा शपथविधी सोहळा राजभवनात संपन्न; राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते दिली शपथ!
Next articleएम्प्रेस गार्डनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त ‘उर्वशी’ वृक्षाचे रोपण; पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम
दर्जेदरनामा डिजिटल न्यूज चॅनल हा आधुनिक बातम्या प्लेटफॉर्म आहे ज्याच्या मुख्य धोरण जगातल्या ताज्या बातम्यांची आणि सूक्ष्मविश्लेषणांची देणगी आहे. त्याच्या समर्पणात वास्तविक रिपोर्टिंग आणि गहन कवरेजवर बल देता, दर्जेदरनामा ह्या चॅनलची उपस्थिती जागतिक घटनांवर, राजकीय घटनांवर, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, आणि इतर विविध विषयांवर ठराव ठेवते. या चॅनलचा उपयोग करून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना वास्तविक वेळेवर अद्यावत आणि बहुमुखी पात्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृढ टीम बातम्यापत्रकारांच्या आणि संवाददात्यांच्या समर्पणाच्या माध्यमातून, दर्जेदरनामा बातम्यापत्रकारीता पत्रकारितेच्या उच्चतम मानकांची रक्षा करतो आणि त्याच्या कामाच्या उच्च मानकांसोबत कड़ी संबंध साधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here