Home Breaking News फॉरेस्ट ट्रेल्स” टाउनशिपमधील रहिवाशांची PMRDA आयुक्तांकडे तक्रार

फॉरेस्ट ट्रेल्स” टाउनशिपमधील रहिवाशांची PMRDA आयुक्तांकडे तक्रार

67
0
फॉरेस्ट ट्रेल्स” टाउनशिपमधील रहिवाशांची PMRDA आयुक्तांकडे तक्रार- परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लि.वर (PSCL) अनियमिततेचे गंभीर आरोप

पुणे – खासगी टाउनशिप फॉरेस्ट ट्रेल्स येथील रहिवाशांनी परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लि. (PSCL) विरोधात वाढत्या समस्या आणि टाउनशिप मधील अनियमिततेच्या विरोधात आवाज उठवला आहे. 6 जानेवारी 2025 रोजी रहिवाशांनी प्रभात रोडवरील PSCL च्या कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने केली होती. त्यानंतर, टाउनशिप मधील सुमारे 500 कुटुंबांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आयुक्तांकडे अधिकृत सुनावणी घेण्याची मागणी केली.

PMRDA आयुक्तांनी रहिवाशांच्या मागणीला मान्यता देत 21 जानेवारी 2025 रोजी आपल्या कार्यालयात सुनावणी घेतली. फॉरेस्ट ट्रेल्स येथील विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी या सुनावणीत सहभागी झाले.

रहिवासी श्री. उदय कुलकर्णी यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे पुरावे सादर करत, प्रकल्प विकासकाने (PP) केलेल्या गंभीर अनियमितता आणि शासनाच्या अटींचे उल्लंघन याबाबत सविस्तर माहिती दिली.

सुनावणीच्या दरम्यान,
श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, शासनाने PSCL ला टाउनशिप मंजुरी देताना काही अटी घातल्या होत्या, मात्र या अटींचे वारंवार उल्लंघन झाले आहे. त्यांनी पुराव्यांसह हेही निदर्शनास आणले की, प्रकल्प विकासकाने शासनाकडे खोटे प्रतिज्ञापत्रे आणि खोटा अनुपालन अहवाल सादर करून मंजुरी घेतली आहे.

PMRDA ने टाउनशिपशी संबंधित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, रहिवासी आता अधिकृत तपासणीची प्रतीक्षा करत आहेत.

रहिवाशांच्या मुख्य तक्रारी:

वारंवार  खंडित होणारा वीजपुरवठा .
शासनाच्या नियमानुसार, प्रकल्प विकासकाने वीजपुरवठ्यासाठी MSEDCL ला जागा देऊन उपकेंद्र उभारणे गरजेचे होते. मात्र, 12 वर्षांनंतरही टाउनशिप मध्ये विजेचे उपकेंद्र नाही. परिणामी, संपूर्ण टाउनशिप गावाच्या ग्रिडवर अवलंबून आहे, आणि  त्यामुळे वारंवार वीज खंडित होते.

 अतिरिक्त दराने पाणीपुरवठा

टाउनशिप मंजुरीच्या अटींनुसार, वाजवी दरात पिण्याचे पाणी पुरवणे आवश्यक आहे. हा दर सुरूवातीला २०१२ साली १६₹/किलोलीटर इतका होता. २ वर्षानी तो ४८₹/ किलोलिटर केला गेला.आणि आता तो १००₹/कीलोलिटर इतका वाढवण्यात आला आहे. वाढीव दराने  पाण्याचे पैसे भरले नाही तर पाणीपुरवठा बंद करण्याचाही इशारा रहीवाशांन देण्यात आला आहे.या संबंधित तक्रार रहिवाशांनी पोलीस स्टेशन ला नोंदविली आहे.

 मूलभूत सुविधा

नियमानुसार 38 एकर बाग, मैदाने आणि उद्याने असणे गरजेचे आहे, मात्र टाउनशिपमध्ये 3 एकापेक्षा ही कमी जागा या सुविधांसाठी वापरण्यात आली आहे.
२१०१२ सालापासून रुग्णालयासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर विक्री कार्यालय उभे आहे.
काही इमारतींमध्ये मलनिस्सारण संयंत्र (STP) नाही, त्यामुळे मैलाविहीन पाणी थेट टाक्यांमध्ये साठवले जात आहे.

टाउनशिप नियमांमध्ये प्रकल्प विकासकाने चुकीची व दिशा भूल करणारी माहिती दिल्यास टाउनशिप ची परवानगी रद्द करुन चालू काम थांबवण्याची अट प्रकल्प विकासकावर घातली आहे.

(यासोबत पुराव्यांची सूची आणि आवश्यक दस्तऐवज PMRDA कडे सादर करण्यात आले आहेत.)

Previous articleपुण्यात जुन्या वादातून तरुणांची दहशत! रिक्षा, गाड्यांची तोडफोड; पोलिसांची तत्पर कारवाई, सहा जणांना अटक
Next articleनागपुरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक!
Darjedarnama Digital News Channel is a modern news platform focused on delivering the latest news and insightful analysis from around the world. With a commitment to factual reporting and in-depth coverage, Darjedarnama aims to keep its audience informed about current events, politics, technology, culture, and more. The channel leverages digital technology to provide real-time updates and multimedia content, ensuring that viewers receive the most comprehensive and engaging news experience possible. Through its dedicated team of journalists and correspondents, Darjedarnama strives to uphold the highest standards of journalism and maintain a strong connection with its audience.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here