पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रम’ अंतर्गत नागरिकसेवा केंद्रित कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी करून इतर महापालिकांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) चे अधिकारी सुब्रतो घोष, एच. बी. चावला आणि जयेश यादव यांनी गुरुवारी (२४ एप्रिल) पिंपरी-चिंचवड महापालिकेची भेट घेतली.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आणि विविध विभागप्रमुख उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी QCI अधिकाऱ्यांसमोर पालिकेच्या विविध योजनांची संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रभावी मांडणी केली.
महानगरपालिका नागरिकांसाठी जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध डिजिटल आणि ऑफलाईन उपक्रम राबवत आहे. यामध्ये ई-गव्हर्नन्स, स्वच्छता मोहिमा, नागरी सुविधा केंद्रांची उभारणी, रस्ते व पाणी पुरवठा प्रकल्प, महिला व दिव्यांग हिताच्या योजना, यांचा समावेश आहे.
प्रत्यक्ष स्थळ पाहणीची ठळक वैशिष्ट्ये :
QCI अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या चारही मजल्यांवर फिरून विविध यंत्रणांचे मूल्यांकन केले. यामध्ये खालील बाबींचा समावेश होता :
-
नागरिक भेट व्यवस्थापन प्रणाली
-
स्वच्छता गृह आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा
-
पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था
-
प्रत्येक विभागातील अभिलेख व्यवस्थापनाची काटेकोर मांडणी
-
शालेय विद्यार्थ्यांनी सजवलेली जिन्यांची भित्तिचित्रे
-
स्थापत्य विभागाने लावलेल्या झाडांच्या कुंड्यांची आकर्षक सजावट