Home Breaking News गुन्हे शाखा युनिट ६ ची मोठी कारवाई! वाघोली आणि लोणी काळभोर येथे...

गुन्हे शाखा युनिट ६ ची मोठी कारवाई! वाघोली आणि लोणी काळभोर येथे अवैध दारू भट्ट्यांवर छापे – लाखोंचा मुद्देमाल जप्त!

62
0

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने वाघोली आणि लोणी काळभोर परिसरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर धडक कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखा युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेअंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

लोणी काळभोरमध्ये मोठी कारवाई – १५,००० लिटर कच्चे रसायन जप्त!

युनिट ६ चे पथक गस्त घालत असताना, त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील रामदरा डोंगराच्या पायथ्याशी अवैध दारू भट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकत कारवाई केली.

मुकेश करमावत (वय ५०, रा. गणेशनगर, फुरसुंगी, पुणे) हा मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ७५० लिटर गावठी दारू, १५,००० लिटर कच्चे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण ८.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी मुकेश करमावत याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वाघोलीमध्ये महिला आरोपीच्या दारू व्यवसायावर छापा – मोठ्या प्रमाणात दारू जप्त!

दि. ५ मार्च २०२५ रोजी युनिट ६ च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की वाघोली, बोरकर वस्ती येथील मोकळ्या जागेत एक महिला गावठी दारू तयार करत आहे. पोलिसांनी तत्काळ धाड टाकून कारवाई केली असता, रीना पवन राजपूत हिच्याकडून ७० लिटर गावठी दारू, ४,००० लिटर कच्चे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण १.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी रीना पवन राजपूत हिच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला हादरा!

गुन्हे शाखेच्या या मोठ्या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त वाढवून अशा बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन – पोलिसांचे प्रशंसनीय काम!

या कारवाईसाठी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी आणि त्यांचे पथक यांनी केली. यामध्ये बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर आणि महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

Previous articleपोलिसाचा वाढदिवस गुन्हेगारांच्या सोबत; चौघा पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
Next articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण.
दर्जेदरनामा डिजिटल न्यूज चॅनल हा आधुनिक बातम्या प्लेटफॉर्म आहे ज्याच्या मुख्य धोरण जगातल्या ताज्या बातम्यांची आणि सूक्ष्मविश्लेषणांची देणगी आहे. त्याच्या समर्पणात वास्तविक रिपोर्टिंग आणि गहन कवरेजवर बल देता, दर्जेदरनामा ह्या चॅनलची उपस्थिती जागतिक घटनांवर, राजकीय घटनांवर, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, आणि इतर विविध विषयांवर ठराव ठेवते. या चॅनलचा उपयोग करून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना वास्तविक वेळेवर अद्यावत आणि बहुमुखी पात्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृढ टीम बातम्यापत्रकारांच्या आणि संवाददात्यांच्या समर्पणाच्या माध्यमातून, दर्जेदरनामा बातम्यापत्रकारीता पत्रकारितेच्या उच्चतम मानकांची रक्षा करतो आणि त्याच्या कामाच्या उच्च मानकांसोबत कड़ी संबंध साधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here