Home Breaking News महापालिकेच्या वतीने आयोजित रानजाई महोत्सवाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते उद्घाटन
म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षांचे महत्त्व अमूल्य आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा मोठा भाग हिरवाईने नटलेला असून, शहराचे पर्यावरण संतुलीत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वृक्ष प्राधिकरण समिती करत असते. वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण आणि नागरिकांना हरित उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे, हे या समितीचे उद्दीष्ट आहे. महापालिकेने गेल्या २८ वर्षांपासून रानजाई महोत्सवाचे सातत्याने आयोजन करून हा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न केला आहे. हा महोत्सव केवळ प्रदर्शन नसून एक प्रेरणादायी स्पर्धा आहे, जी नागरिकांमध्ये वृक्षलागवडीविषयी जागरूकता निर्माण करते. या माध्यमातून अधिकाधिक वृक्षारोपण होऊन शहर अधिक पर्यावरणपूरक बनण्यास मदत होत आहे. स्पर्धेमध्ये विविध शोभिवंत फुले, फळझाडे आणि रोपांची आकर्षक मांडणी केली जाते. या घटकांचे परीक्षकांमार्फत मूल्यमापन करून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जातात. सलग तीन दिवस चालणाऱ्या या हरित सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाला पाठबळ द्यावे.