पुणे : आनंदमार्ग शिबिर दुगड फार्म जैन मंदिर, कात्रज येथे फेब्रुवारी ७, ८, ९ तारखेस आयोजित करणेत येत आहे. आनंदमार्ग हा सामाजिक व आध्यात्मिक विचार देते. येथे ध्यान, धारणा, योग, किर्तन व अन्य क्लासेस घेण्यात येणार आहे. आनंदमार्ग तर्फे आचार्य संपूर्णानंद उपस्थित राहतील. यामध्ये १०० ते १५० प्रतिस्पर्धी भाग घेतील व ते प्रशिक्षण देणार आहेत. येथे निःशुल्क भोजन व्यवस्था आहे. तसेच ३ तास किर्तन होईल.
किर्तन :- आता हे किर्तन कोणाचे करायचे? तर हे किर्तन हरीचे करायचे. हरि म्हणजे कोण? ‘हरति पापाणी इत्यर्थ हरि’ जो आपले पाप हरण करतो तो हरि. जी व्यक्ति मनोभावे, श्रध्दापूर्वक किर्तन करेल त्याचे पाप हरि हरण करतोच. किर्तनाने मन शुध्द पवित्र होऊन सकारात्मक विचार येतो.
नारदमुनि सांगतात, ‘मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामी नारदः ‘
श्रेय आणि प्रेय’ ‘श्रेय आणि प्रेय’ कृष्ण यजुर्वेद हे पुस्तक ब्रम्हविज्ञान आहे. त्यात एक प्रकरण ‘कठोपनिषद’ आहे. यामध्ये ‘परा व अपरा, विद्या व श्रेय आणि प्रेय’ यातील भेद व्यक्त केलेला आहे.
‘श्रेय आणि प्रेय’ पुर्णपणे परस्पर विरोधी शब्द आहेत. जरी ते परस्पर विरोधी असले तरी या दोघांचा एकाच वेळी मानवी मनावर परिणाम होताना दिसुन येतो. या दोघांची मिश्र भावना एकाच वेळी मानवी मनाला उत्तेजित करते आणि या उत्तेजनाचा विचार न करता प्रियजनाच्या शोधात भटकणारा माणूस अंतिम ध्यैयापासुन वंचित होतो. जे दुःखापासुन मुक्ति देतो. त्याला संपति म्हणतात ही निवृती दोन प्रकारची असते. एक म्हणजे दुःखाचे तात्पुरते निर्मुलन आणि दुसरे म्हणजे संपूर्ण त्या मुळापासुन निर्मुलन, तात्पुरत्या आरामाने दुःखाच्या पुनरावृतिची शक्यता नाहिशी होत नाही. पूर्णतः मुक्ति होत नाही आणि जे अंतिम मोक्षाकडे घेऊन जाते, तिथे दुःख पुर्णपणे नष्ट होऊन त्याच्या बीजासह जळून जाते. त्यास परमार्थ म्हणतात.