Home Breaking News जानेवारी २०२५ अखेर महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी असे एकूण २० जण सेवानिवृत्त.

जानेवारी २०२५ अखेर महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी असे एकूण २० जण सेवानिवृत्त.

74
0
पिंपरी,  सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने व प्रामाणिकपणाने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या लौकिकात भर पडली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कामाचा आदर्श महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुढील आरोग्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.dar
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे माहे जानेवारी २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ अशा एकूण २० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी अनिल पासलकर,चारूशिला जोशी, प्रशासन अधिकारी डी.डी.कांबळे,कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर,विजया कांबळे,बालाजी अय्यंगार,रमेश लोंढे,एकता कर्मचारी संघटनेचे गणेश भोसले यांसह विविध विभागातील कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, उपलेखापाल सरीता मोरे, प्रयोगशाळा सहाय्यक किशोर नांगरे, लिपीक नितीन येम्बर, कॉम्प्युटर ऑपरेटर शैलेंद्र पानसरे, उपशिक्षक बिभिषण फलफले, मुकादम अनुसया घोटकुले, शिपाई महेंद्र घोणे, नाईक राजेंद्र गावडे, आया शोभा कोद्रे, मजूर संजय शिंदे, तुकाराम गायकवाड, गजानन सांडभोर, परवीन नदाफ, सफाई कामगार कमल गायकवाड, सफाई सेवक मनोहर सारसर, कचरा कुली मोहन साबळे यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आया वृषाली चौधरी, सफाई कामगार मंदा राखपसरे, गटरकुली मनोहर अवतारे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
Previous articleभारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा: केंद्रीय अर्थसंकल्प 2025 च्या आधी होणार असलेली चढ-उतार
Next article🌊 मेक्सिकोच्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा ओअरफिशचे दर्शन! मोठ्या नैसर्गिक संकटाचा इशारा? 🌊
दर्जेदरनामा डिजिटल न्यूज चॅनल हा आधुनिक बातम्या प्लेटफॉर्म आहे ज्याच्या मुख्य धोरण जगातल्या ताज्या बातम्यांची आणि सूक्ष्मविश्लेषणांची देणगी आहे. त्याच्या समर्पणात वास्तविक रिपोर्टिंग आणि गहन कवरेजवर बल देता, दर्जेदरनामा ह्या चॅनलची उपस्थिती जागतिक घटनांवर, राजकीय घटनांवर, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, आणि इतर विविध विषयांवर ठराव ठेवते. या चॅनलचा उपयोग करून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना वास्तविक वेळेवर अद्यावत आणि बहुमुखी पात्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृढ टीम बातम्यापत्रकारांच्या आणि संवाददात्यांच्या समर्पणाच्या माध्यमातून, दर्जेदरनामा बातम्यापत्रकारीता पत्रकारितेच्या उच्चतम मानकांची रक्षा करतो आणि त्याच्या कामाच्या उच्च मानकांसोबत कड़ी संबंध साधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here