Home Breaking News पैसे तयार ठेवा, या आठवड्यात 9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी,...

पैसे तयार ठेवा, या आठवड्यात 9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी

54
0

IPO Update मुंबई : 2024 या वर्षाचा आता शेवटचा महिना सुरु आहे. यंदा आयपीओतील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचं पाहायला मिळालं. वारी एनर्जीज, प्रिमियम एनर्जीज, पीएनजी ज्वेलर्स या सारख्या अनेक आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. एसएमई क्षेत्रातील आयपीओतील गुंतवणूक देखील फायदेशीर ठरली. आता या आठवड्यात 9 आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले होणार आहेत. तर, काही आयपीओचं लिस्टींग देखील या आठवड्यात होणार असल्यानं शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील.

या आठवड्यात 9 कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शन साठी खुले होतील. याशिवाय मोबिक्विक, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेस या कंपनीचे आयपीओ उद्या लिस्ट होणार आहेत.

गुजरातची कंपनी ममता मशिनरीनं 179 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 230 ते 243 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ 19 डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि 23 डिसेंबरपर्यंत बोली लावता येईल.

ट्रान्सरेल लाइटिंग कंपनीचा आयपीओ देखील 19 डिसेंबरला खुला करण्यासाठी तयारी करत आहे.

DAM कॅपिटल अडवायजर्सचा आयपीओ देखील 19 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. सनातन टेक्स्टाइल देखील 19 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल तर 23 डिसेंबरपर्यंत बोली लावता येईल. या आयपीओचा किंमतपट्टा 305 ते 321 रुपये असेल. वेंटिव हॉस्पिटलिटीनं देखील त्यांचा आयपीओ 20 डिसेंबरला लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बोली लावण्याची मुदत 24 डिसेंबरला आहे.

कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टीम्सचा आयपीओ देखील 19 डिसेंबरला खुला होईल.या आयपीओचा किंमतपट्टा प्रति शेअर 665-701 रुपयांदरम्यान असेल.

एसएमई क्षेत्रात देखील तीन आयपीओ येणार आहेत. यामध्ये NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर, न्यू मलयालम स्टील आणि आयडेंटिकल ब्रेन्स स्टुडिओजचे आयपीओ 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.

तीन आयपीओ उद्या लिस्ट होणार
आयपीओत गुंतवणूक केल्यानं चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गेल्या अनेक आयपीओच्या लिस्टींगनंतरच्या आकडेवारीनुसार पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांमध्ये आयपीओ सबस्क्राइब करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. आता उद्या तीन कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होत आहेत. यामध्ये मोबिक्विक या फिनटेक कंपनीचा तर विशाल मेगा मार्ट या सुपर मार्केट साखळी चालवणाऱ्या कंपनीचा आयपीओ लिस्ट होणार आहे. याशिवाय साई लाइफ सायन्सेस या कंपनीचा आयपीओ देखील लिस्ट होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here