सांगली : माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला डाग लागला आहे. कोणताही महिला भावावर डोळे झाकून विश्वास ठेवते. मात्र सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, इतकंच नाहीतर दोन वर्षे तो आपल्या मित्रांसोबत तिचा लैंगिक छळ करत होता. दोन वर्षांनंतर आता ही घटना कशी समोर आली? जाणून घ्या.
सुट्टीसाठी सांगलीत आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात कोणी नसल्याचे पाहून अल्पवयीन सख्ख्या भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी भावाने हे कृत्य केल्यानंतर त्याने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांसह बहिणीसोवत सतत अश्लील चाळे करणे सुरूच ठेवले होते. हा प्रकार हा एक जानेवारी २०२२ ते तीन जून २०२४ या कालावधीत घडली. याचाबतची फियांद पुण्यातील एका शाळेतील समुपदेशक महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात दिली होतो. ही तक्रार पुण्यातून सांगलीनील संजयनगर फॉलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आई, भाऊ आणि बहिणीसह पुण्यात राहते. ती कुटुंबीयांसह दिवाळीच्या सुट्टीसाठी सांगलीतील आजीच्या घरी आली होती. एके दिवशी आई, बहीण आणि आजी या बाजारात खरेदीसाठी गेल्या असताना पीडित मुलीचा अल्पवयीन सख्खा भाऊ पीडितेच्या खोलीत आला. या वेळी त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्या दिवसापासून संशयित अल्पवयीन मुलगा अश्लील बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होता. संशयित मुलाचे दोघे अल्पवयीन मित्रही पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करत होते. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आपली तक्रार शाळेतील एका समुपदेशनाच्या वेळी मांडली. त्यानंतर ही घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. या गुन्ह्याला सांगलीतून सुरुवात झाल्याने पुण्यातील फरासखाना पोलिसांनी संजयनगर पोलिस ठाण्याकडे पुढील तपासासाठी हा गुन्हा वर्ग केला आहे.