मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार व मा.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांचे सुचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन विविध उपाययोजना करणेबाबत निर्देश देऊन पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांना त्यांचे मतदान प्रत्यक्षात कोणत्या मतदान केंद्रावर होणार आहे याची माहिती देणेबाबत किंबहुना हे अभियान मोठया प्रमाणात राबविणेबाबत निर्दश दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील मतदानांची टक्केवारी वाढविणेच्या दृष्टीकोनातुन व दि. २०/११/२०२४ रोजी मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रात आहे हे सुलभरित्या समजणेच्या दृष्टीकोनातुन पर्यायाने दि. २०/११/२०२४ रोजीची मतदानाची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात Know Your Polling Station हा कक्ष क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियत्रंणाखाली पुढीलप्रमाणे गठीत करण्यात आलेला आहे. सबब, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी त्यांचे मतदान नक्की कोठल्या मतदान केंद्रात आहे हे समजणेकामी पुढील ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा रकाना क्रमांक ४ मध्ये नमुद क्रमांकावर संपर्क साधावा.
अ.क्र. | नियंत्रित अधिकारी यांचे नांव व पदनाम | क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता | सारथी हेल्पलाईन नंबर | |
१ | २ | ३ | ४ | |
१ | श्रीम. शितल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी, अ क्षेत्रीय | भेळ चौक, निगडी, प्राधिकरण, पुणे ४४ | 8888006666,
020-67339999 |
|
२ | श्री. अमित पंडीत, क्षेत्रीय अधिकारी, ब क्षेत्रीय | लिंकरोड, एल्प्रो मॉल जवळ, चिंचवड, पुणे ३३ | 8888006666,
020-67339999 |
|
३ | श्री. तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी,क क्षेत्रीय | नेहरुनगर, भोसरी, पुणे ४११ ०२६ | 8888006666,
020-67339999 |
|
४ | श्री. श्रीकांत कोळप, क्षेत्रीय अधिकारी, ड क्षेत्रीय | औंध रावेत बी.आर.टी रोड, रहाटणी, पुणे १७ | 8888006666,
020-67339999 |
|
५ | श्री. राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी,ई क्षेत्रीय | ग्रोथ लॅब बिल्डींग, पांचर पोळ समोर, भोसरी | 8888006666,
020-67339999 |
|
६ | श्री. सिताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी, फ क्षेत्रीय | लोकमान्य टिकळ चौक, निगडी, पुणे ४४ | 8888006666,
020-67339999 |
|
७ | श्री. किशोर ननवरे, क्षेत्रीय अधिकारी, ग क्षेत्रीय | दिलिप वेंगसरकर क्रि. अकॅडमी, थेरगांव, ३३ | 8888006666,
020-67339999 |
|
८ | श्री. उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी, ह क्षेत्रीय | महिला आय. टी.आय, कासारवाडी | 8888006666,
020-67339999 |
|
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात दि. २९/१०/२०२४ पासून ते दि. २०/११/२०२४ रोजी मतदानाची वेळ संपेपर्यंत Know Your Polling Station या अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मतदारांना त्यांचे मतदान नक्की कोणत्या मतदान केंद्रात आहे हे मतदारांना समजणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियत्रंणाखाली वरीलप्रमाणे स्वतंत्र कक्ष स्थापन करणेत आलेले आहेत.
पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांनी त्यांचे नजिकच्या क्षेत्रीय कार्यालयातील Know Your Polling Station या कक्षाशी स्वत: दुरध्वनी वर अथवा समक्ष संपर्क साधल्यास त्यांचे मतदार यादीतील नांव ऑनलाईन पध्दतीने शोधुन देण्यास वरील कक्षामार्फत मदत करण्यात येणार आहे.
मतदारांना आवाहन :-
१) मतदार यादीत नांव शोधण्यासाठी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्रावरील इपिक नंबर EPIC NO (Electors Photo Indentification Card) समक्ष अथवा दुरध्वनी वरुन सांगितलेस संबंधीत कर्मचा-यांना मतदार यादीत संबंधीत मतदाराचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे शोधणे सुलभ जाईल. याकरीता वेळ लागणार नाही. सबब, मतदारांनी त्यांचा निवडणूक ओळखपत्रावरील इपिक नंबर सांगुन आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर होणार आहे हे समजून घ्यावे.
२) निवडणूकीचे ओळखपत्र अथवा निवडणूकीचे ओळखपत्रावरील इपिक नंबर प्रयत्न करुनही उपलब्ध होत नसल्यास तुम्हाला संबंधीत कर्मचा-याला तुमचे नांव, वय, जन्मतारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन/भरुनही तुमचे मतदान कोणत्या मतदान केंद्रात आहे हे शोधता येईल. तुमच्यासह तुमच्या कुंटुंबातील इतरांची नांवे शोधता येऊन शकतात.
३) जर मतदाराच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी निवडणूक आयोगाच्या डेटा मध्ये झाली असल्यास मतदाराला मोबाईलवर ओटीपी द्वारे सुध्दा नांव सहज शोधु शकता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांनी वरील गोष्टीचा वापर केल्यास त्यांचे नांव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे हे शोधण्यासाठी मदत होणार आहे. मतदार ओळखपत्रावरील नंबर वरुन त्यांचे नांव कोणत्या मतदार केंद्रामध्ये आहे हे शोधणे अधिक सुलभ, सोपे आहे. यासाठी सर्व मतदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांना मनपाच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६, ०२०–६७३३९९९९ यावर संपर्क साधुन अथवा समक्ष जाऊन प्रामुख्याने निवडणूकीचे ओळखपत्रावरील इपिक नंबरचा वापर केल्यास त्यांचे नांव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे हे सहजरित्या कळणार आहे.
४) याशिवाय मतदारांना पुढील नमुद केलेल्या वेबसाईटवर सुध्दा नांव शोधता येईल.
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट :- https://electoralsearch.eci.gov.in/
- राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट :- https://ceoelectrion.maharashtra.gov.in/ceo/
- केंद्रीय निवडणूक आयोगाची वेबसाई :- https://voters.eci.gov.in/ यावर सर्च करता येईल.
- Voter Helpline app हे अप डाऊनलोड करुन त्यावर मतदार यादीत नांव शोधता येईल.
- Voter Helpline Number :- 1950
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांना आवाहन करणेत येत आहे की, उपरोक्त नमुद केलेप्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आपला मतदानांचा हक्क बजावावा व मतदान करण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी वर नमुद केलेप्रमाणे निवडणूक आयोगाने मतदार यादीत नांव शोधण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहे. त्याचा वापर करुन पिंपरी चिंचवड शहारातील मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी करावा. असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करणेत येत आहे.