- धनत्रयोदशीच्या दिवसावर सोन्याच्या भावांनी हाहाकार माजवला आहे
- दिवाळी लोक आर्वजून सोन्याचे दागिने बनवतं असल्याने सोन्याचे भाव वधारले
- आज सोन्याची किंमत ६०० रुपयांनी वाढली
धनत्रयोदशी हा सण समृद्धीचे प्रतीक मानला जातो, आणि या दिवसावर अनेक लोक सोनं खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र, या वर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये असमंजसता आणि उल्हासाची भावना दिसून येत आहे. आजच्या दरानुसार सोनं खरेदी करण्यासाठी सामान्य ग्राहकांना थोडा खर्च अधिक करावा लागणार आहे.
दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता सोन्याच्या चमकेची झळ बसणार आहे. मागील काही दिवस सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठलेले पाहायला मिळाले तसेच आजही आता दिवाळीच्या पहिल्या दुवशी सोन्याची चमक ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८०,४५० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३,७५० रुपये आहे. १ किलो चांदीची किंमत ही आज ९९,००० रुपये इतकी आहे.
सोन्याच्या वाढलेल्या दरांचे कारण जागतिक आर्थिक परिस्थिती आणि बाजारातील चढ-उतारांशी संबंधित आहे. अमेरिकेतील आर्थिक स्थैर्य, जागतिक पातळीवरील व्यापारी अनिश्चितता, आणि डॉलरच्या मूल्यातील बदल यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
धनत्रयोदशीसाठी विशेष टिप्स:
- बजेटमध्ये राहून सोनं खरेदी करण्याचे प्रयत्न करा.
- सोन्याची गुंतवणूक दीर्घकालीन फायदा देऊ शकते.
- बाजारातील दरांमध्ये होणारे चढ-उतार समजून निर्णय घ्या.
ग्राहकांनी आपल्या गरजा व आर्थिक नियोजन विचारात घेऊनच खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.