Home Breaking News “चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी ऐश्वर्या जगताप रेणुसे यांचा आवाहन – शंकर जगताप यांना...

“चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी ऐश्वर्या जगताप रेणुसे यांचा आवाहन – शंकर जगताप यांना प्रचंड मतांनी विजयी करा”

71
0

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचे स्वप्न पाहिले होते, आणि त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आता त्यांची कन्या ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी पुढाकार घेतला आहे. ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी चिंचवड विधानसभेच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले आहे.

काळेवाडी परिसरातील मतदारांशी संवाद साधताना, त्यांनी सांगितले की, “माझे वडील स्व. लक्ष्मण जगताप यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या मतदारसंघाच्या विकासासाठी कष्ट केले. त्यांच्या संकल्पांना पुढे नेण्यासाठी, चिंचवडच्या विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी, शंकर जगताप यांना संधी दिली पाहिजे.” त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत, विठ्ठल रखुमाई कॉलनी, ज्योतिबा कॉलनी, काळेवाडी अशा विविध भागांमध्ये भेटी दिल्या.

यावेळी, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, नीताताई पाडाळे, भरत ठाकूर, विनोद तापकीर, आणि महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ऐश्वर्या रेणुसे यांनी या सगळ्यांना सोबत घेऊन प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या प्रचार मोहिमेत नागरिकांना आश्वासन देण्यात आले की, जर शंकर जगताप यांना विजयी केले, तर लक्ष्मणभाऊंचे सर्व स्वप्नं साकार केली जातील.

अशाप्रकारे, चिंचवड विधानसभेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी मतदारांनी शंकर जगताप यांना भरभरून पाठिंबा देण्याचे आवाहन केले जात आहे. “चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हे पाऊल अत्यावश्यक आहे,” असे ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here