Home Breaking News “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासाच्या दिशेने राज्यात मोठे पाऊल – मुंबईत मराठी भाषा...

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासाच्या दिशेने राज्यात मोठे पाऊल – मुंबईत मराठी भाषा भवनासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण”

50
0

मुंबई :-  मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी जवाहर बाल भवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. नवी मुंबईच्या ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या मराठी साहित्यिक सदन इमारत बांधकामाच्या भूमिपूजनासह विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.
कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आज भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आलेले विकास प्रकल्प –
✅ सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन

✅ जवाहर बालभवन, मुंबई या इारतीमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रेक्षागृह, संगीत कक्ष, ग्रंथालय व इतर अनुषंगिक कामांचा शुभारंभ

✅ सर ज. जी. कला संस्था वसतिगृह व सर ज. जी. वास्तुशास्त्र वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन

✅ शासकीय तंत्रविज्ञान महाविद्यालये मुले व मुलींचे वसतिगृह, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

✅ महाराष्ट्र राज्य तंत्र निकेतन मंडळ, प्रशासकीय इमारत, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

✅ वरळी, मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

✅ नायगाव, दादर, भायखळा, शिवडी, शीव (सायन), वरळी पोलीस वसाहत लोकार्पण/भूमिपूजन

✅ उमरखाडी, डोंगरी, डेव्हिड ससून येथील बालसुधारगृह बांधकामांचे लोकार्पण

✅ नागरिक, देशी व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी भारतीय औषधी पद्धतीच्या प्रचार व प्रसारासाठी पोद्दार रुग्णालय, वरळी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पंचकर्म सुविधांचा शुभारंभ.

✅ सेंट्रल बस स्टॅण्ड व मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहक/चालक यांच्याकरिता वातानुकूलित विश्रामगृहाचे लोकार्पण

✅ नूतनीकरण केलेल्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार भवन व विविध क्रीडा सुविधा संकुलाचे लोकार्पण

✅ मत्स्य व्यवसाय विकास कार्यक्रम भूमिपूजन

✅ मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर परिसर विकास कामाचे भूमिपूजन

✅ बाबुलनाथ मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ

✅ कै. श्री. जगनाथ शंकरशेट यांचे स्मारक व कै. श्री. भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

✅ जे. जे. उडाणपुलाखालील हो- हो बेस्ट बसेसमध्ये तयार करण्यात आलेले कलादालन व वाचनालय लोकार्पण

✅ ए विभाग, मुंबई येथील बधवार पार्क येथे फूड प्लाझाचा शुभारंभ

✅ ए ते डी वॉर्ड येथे पिंक टॉयलेटचे लोकार्पण

✅ मुंबई शहरामध्ये १४ ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ व ७ ठिकाणी भूमिपूजन

✅ फॅशन स्ट्रीटच्या कायापालटाचा शुभारंभ व भूमिपूजन

✅ मुंबई शहरातील दलित वस्तीमध्ये दहा ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका उपक्रमाचा शुभारंभ

✅ ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयी सुविधा उपक्रमाचा शुभारंभ

✅ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेसवरील किचन गार्डनचे लोकार्पण

✅ मुंबई शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण

✅ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या मंजूर प्रकल्पाचे सादरीकरण

✅ दादर चौपाटी किनारा पुनर्भरणी

✅ मुंबई शहरातील जुन्या म्हाडा इमारतींमध्ये उद्वाहन (लिफ्ट) सुविधा निर्माण करणे

✅ सर ज. जी. रुग्णालयातील वॉर्ड नूतनीकरण व यंत्र सामुग्री लोकार्पण

✅ वरळी दुग्धशाळा येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण

बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या विविध विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here