भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. मंगळवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे.
बांगलादेश दुसऱ्या डावात 146 धावांत सर्वबाद झाला. सलामीवीर शादमान इस्लामने 50 आणि मुशफिकर रहीमने 37 धावा केल्या. भारतीय संघाकडून रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी 3-3 बळी घेतले, तर आकाश दीपला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांत गुंडाळले. त्यानंतर त्यांनी 34.4 षटकात 9 विकेट गमावत 285 धावा केल्या आणि बांगलादेशच्या दोन विकेट्सही घेतल्या. पावसामुळे तिसऱ्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला, तर पहिल्या दिवशी केवळ 35 षटके टाकता आली.