Home Breaking News “मतदान करण्याची ४ हजारांहून अधिक धावपटूं,सायकलपटूंनी घेतली शपथ”

“मतदान करण्याची ४ हजारांहून अधिक धावपटूं,सायकलपटूंनी घेतली शपथ”

44
0

“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ ४ हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटूंनी महापालिकेतील अधिकाऱ्यांसमवेत रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या पदाधिकाऱ्यांसह रनथॅान कार्यक्रमात घेतली.

         येत्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका व रोटरी क्लब ाफ निगडी यांच्या वतीने आयोजित रनथॅान ाफ होप मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ४ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी आजच्या कार्यक्रमात निवडणूकीत मतदान करण्याची शपथ घेतली.

आज पहाटे ६ वाजता निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमास मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,इंटरनॅशनल रोटरी क्लबचे नियोजित प्रांत पाल नितीन ढामले,  रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले,रनथाॅनचे संचालक केशव मानगे , महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे,  सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे,किरण मोरे, मुकेश कोळप, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे,कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,रोटरी क्लबचे सचिव डाॅ.रविंद्र कदम,शशांक फडके तसेच माजी सैनिक,पोलीस प्रशासन,वाहतुक पोलीस,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विविध विभागातील कर्मचारीही उपस्थित होते.

आजच्या मतदान जनजागृती कार्यक्रमात तरूणांचा मोठा उत्साह…

आज झालेल्या रनथॅान कार्यक्रमात सहभागी झालेल्या धावपटू, सायकलपटूंनी स्वयंस्फूर्तीने मतदान जनजागृतीचे हॅन्डी धरले होते तसेच त्यांनी सेल्फीही काढले आणि येणा-या निवडणूकीत केवळ मतदानच नव्हे तर  मतदान जनजागृतीचा प्रसार व प्रचार करण्याची तयारी दर्शविली.

          मतदार नांव नोंदणीचाही केला प्रचार..

एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आजच्या कार्यक्रमात मतदार यादी नाव नोंदणी करणे,नांव तपासणे,नांव दुरूस्ती करणे यासाठी फ्लेक्सद्वारे प्रसिद्ध प्रचार करण्यात आला.

मतदान जनजागृतीपर शासकीय घोषवाक्यांचा समावेश…

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…

जना-मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे…

आपले अमूल्य मत,करेल लोकशाही मजबूत…

अशा आशयाचे मतदान जनजागृतीचे शेकडो हॅन्डी अधिकारी,खेळाडू तसेच उपस्थित नागरिकांच्या हातात दिसून येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here