भारतरत्न लता मंगेशकर यांना संगीत जगतात ‘भारतीय गानकोकिळा’ म्हणून ओळखले जाते. हिंदी, मराठी आणि अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. 1985 मध्ये त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी गाणं गायलं होतं, जे त्यांच्यासाठी एक अनोखा अनुभव होता. त्यांनी 14 भाषांमध्ये 50,000 पेक्षा जास्त गाणी गायली असल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.
1985 मध्ये, 56 वर्षीय लता मंगेशकरांनी कॅनडामध्ये गंभीर आजारी मुलांसाठी आयोजित केलेल्या लाभदायीक कॉन्सर्टमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी त्यांनी कॅनेडियन गायिका अॅन मरे यांचे “You Needed Me” हे इंग्रजी गाणं गायले, ज्याला टोरांटो ऑर्केस्ट्राचा साथ लाभला होता. लता मंगेशकर यांचे हे पहिले इंग्रजी गाणं होते. लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांना शिवाजी पार्क येथे शासकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला.