अँड. किशोर नानासाहेब शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि म.न.से. जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष, यांनी आज एका महाविद्यालयीन तरुणीवर चौघांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर विभागाने या घटनेची अधिकृत माहिती घेतली. अँड. शिंदे यांनी कडक कारवाईची मागणी करताना स्पष्ट केले की, पुण्यात अशा घटनांना थारा दिला जाणार नाही.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडलेल्या या घटनेने लोकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण केली आहे. त्यांनी महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे म्हटले आणि अशा गंभीर घटनांवर तातडीने व कठोरपणे कारवाई करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पीडित तरुणीला न्याय मिळवण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.