भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हा खटला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 500 अंतर्गत दाखल करण्यात आला होता. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर 100 कोटी रुपयांच्या सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या बांधकाम आणि देखभालीच्या कामात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना तथ्यहीन आणि बदनामीकारक ठरवत मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी चालू होती. सत्र न्यायालयाने अखेरीस निकाल देत राऊत यांना दोषी ठरवले. आता संजय राऊत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.