मावळ तालुक्याच्या सुवर्णकन्या सेजल मोइकरचा मोठ्या सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आशियाई बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सेजलने मावळ तालुक्याचे नाव जागतिक पटलावर कोरले आहे. मावळातील छोटेसे गाव सुदावडी आणि शेतकरी कुटुंबातून येऊन सेजलने मिळवलेले हे यश प्रेरणादायक आहे.

– We’re thrilled to announce that our trainer at Laa Fitness, Ms. Sejal Moikar, has won the Bronze Medal In Powerlifting Competition in Patiala, Punjab! Total weight lift 447.5kg
सेजल मोइकर, ला फिटनेस जिमची खेळाडू आणि इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या यशस्वी खेळाडूला प्रशिक्षक नितीन म्हाळसकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मालघे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आशियाई स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा किताब देखील सेजलला मिळाला आहे.
या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सेजलला ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन तिचा सन्मान केला. तसेच तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
This article highlights Sejal Moikar’s remarkable achievement and the honor she received for bringing glory to her hometown and inspiring the community.