पुणे: शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे सध्या reels बनवणं त्याला महागात पडलं आहे. समाज माध्यमांवर त्याचे आणि त्याच्या साथीदारांचे reels बनवण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे तरुणाईमध्ये गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याची भीती निर्माण झाली आहे. याच कारणामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजा मारणे याला चौकशीसाठी बोलावले आहे.
गजा मारणेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून “GM Boys” या नावाखाली त्याचे साथीदार reels पोस्ट करत असतात, ज्यात गजा मारणेचा उल्लेख “डॉन”, “भाई” म्हणून केला जातो. या reels मुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळतोय, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी दहीहंडी दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गजा मारणेच्या भेटीचे reels व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले.
याचबरोबर, गजा मारणेने तुरुंगातून सुटल्यानंतर आपली ताकद दाखवण्यासाठी 300 ते 400 गाड्यांची रॅली काढून शहरात दहशत निर्माण केली होती. त्याच्या या reels आणि रॅलीमुळे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोलिसांचा कडक नजर ठेवण्यात आला आहे. तसेच, गजा मारणे सोबत त्याच्या साथीदार टिपू पठाणलाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुंडांच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर पोलिसांची कडक नजर आहे.