पुणे: पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई अनघा धवळे यांनी एका परदेशी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास मैत्रिणीच्या पत्नीला प्रवृत्त केले.
याबाबत संबंधित महिलेने कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाने धवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अनघा धवळे यांनी तक्रारदार महिलेला धमकावत सांगितले की, जर तिने परदेशी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. “मी पुण्याची स्थानिक असून, मला गुंडांशी ओळख आहे.
आम्ही एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करतो, आणि आतापर्यंत ९ कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत,” असेही धवळे यांनी त्या महिलेला सांगितले. याशिवाय, “तुमच्या पतीला ४० ते ५० लाख रुपये मिळतील,” असेही धवळे यांनी प्रलोभन दाखवले होते.
या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, अनघा धवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.