Home Breaking News लोणीकंद : एन्जॉय ग्रुपच्या ७ सराईत गुन्हेगारांना अटक; ७ पिस्तूल आणि २३...

लोणीकंद : एन्जॉय ग्रुपच्या ७ सराईत गुन्हेगारांना अटक; ७ पिस्तूल आणि २३ जिवंत काडतुसे जप्त.

77
0

शिक्रापूर/पुणे: सचिन धुमाळ – लोणीकंद परिसरात झालेल्या हत्या करण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एन्जॉय ग्रुपच्या ७ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या आरोपींकडून ७ पिस्तूल आणि २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यामुळे पुढील मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी:

  • शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७),
  • सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६),
  • अमित म्हस्कु अवचरे (वय २७),
  • ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४),
  • अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७),
  • राज बसवराज स्वामी (वय २६),
  • लतिकेश गौतम पोळ (वय २२).

घटनेचा तपशील: फिर्यादी आणि साक्षीदार हे स्वतः सराईत गुन्हेगार असून दहीहंडी कार्यक्रम संपवून परतताना त्यांच्या विरोधक सुमित उत्तरेश्वर जाधव व इतरांनी कोलवडी परिसरात पूर्ववैमनस्यातून हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुपचे सदस्य या हल्ल्यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, शुभम जगताप आणि सुमित जाधव यांना मुंढवा परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेऊन, नवले ब्रीज परिसरात शोध घेऊन इतर पाच जणांना अटक करण्यात आली.

अमित अवचरे आणि सागर हेगडे यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पाच दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान, आणखी ४ देशी पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

जप्त माल: एकूण ७ पिस्तूल, २३ जिवंत काडतुसे, दोन वाहने आणि ७ मोबाईल असा एकूण ९ लाख १४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड आणि त्यांचे पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here