Home Breaking News नीरज चोप्राचा लोझान डायमंड लीगमध्ये शानदार प्रदर्शन; ८९.४९ मीटर फेकून दुसरे स्थान.

नीरज चोप्राचा लोझान डायमंड लीगमध्ये शानदार प्रदर्शन; ८९.४९ मीटर फेकून दुसरे स्थान.

113
0
Neeraj Chopra finishes second in Lausanne Diamond League with season's best 89.49m.

लोझान: भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने लोझान डायमंड लीगमध्ये गुरुवारी ८९.४९ मीटर फेकून दुसरे स्थान पटकावले. २६ वर्षीय नीरज चोप्रा चौथ्या फेरीपर्यंत चौथ्या स्थानावर होता, परंतु पाचव्या फेरीत त्याने ८५.५८ मीटरपर्यंत फेक केली. मात्र, त्याने शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात सर्वोत्कृष्ट फेक करत ८९.४९ मीटर अंतरावर भाला फेकला, जे त्याच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षा अधिक होते. नीरज चोप्रा सहाव्या फेरीतून बाहेर जाण्याच्या धोक्यात होता, परंतु पाचव्या फेरीत ८५.५८ मीटरची फेक करून त्याने स्वतःला स्पर्धेत टिकवून ठेवले.

ग्रेनेडाच्या दोन वेळा विश्वविजेते आणि पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते अँडरसन पीटर्स यांनी दुसऱ्या फेरीत ९०.६१ मीटर भालाफेक करून पहिले स्थान मिळवले, तर जर्मनीच्या जुलियन वेबर यांनी ८७.०८ मीटर फेकून तिसरे स्थान पटकावले.

“शुरुवात चांगली नव्हती, परंतु माझ्या शेवटच्या फेरीतील दुसऱ्या सर्वोत्तम फेकीवर मी आनंदी आहे. सुरुवात कठीण होती, पण माझ्या जिद्दीने खेळून जो कमबॅक केला त्याचा मला खूप आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने स्पर्धेनंतर व्यक्त केली.

Previous articleएअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी; १३५ प्रवाशांची चौकशी होणार.
Next articleमार्केट यार्ड पोलिसांची धाडसी कारवाई; येरवडा तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला केली अटक.
दर्जेदरनामा डिजिटल न्यूज चॅनल हा आधुनिक बातम्या प्लेटफॉर्म आहे ज्याच्या मुख्य धोरण जगातल्या ताज्या बातम्यांची आणि सूक्ष्मविश्लेषणांची देणगी आहे. त्याच्या समर्पणात वास्तविक रिपोर्टिंग आणि गहन कवरेजवर बल देता, दर्जेदरनामा ह्या चॅनलची उपस्थिती जागतिक घटनांवर, राजकीय घटनांवर, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, आणि इतर विविध विषयांवर ठराव ठेवते. या चॅनलचा उपयोग करून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना वास्तविक वेळेवर अद्यावत आणि बहुमुखी पात्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृढ टीम बातम्यापत्रकारांच्या आणि संवाददात्यांच्या समर्पणाच्या माध्यमातून, दर्जेदरनामा बातम्यापत्रकारीता पत्रकारितेच्या उच्चतम मानकांची रक्षा करतो आणि त्याच्या कामाच्या उच्च मानकांसोबत कड़ी संबंध साधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here