Home Breaking News अटल सेतूवर थरारक घटना: महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या वेळीच...

अटल सेतूवर थरारक घटना: महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या वेळीच केलेल्या कृतीने जीव वाचला

131
0

नवी मुंबई: अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा जीव नावाशेव्हा वाहतूक पोलिसांनी वाचवला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली, आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

मुलुंड येथील राहणारी ही महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने अटल सेतूवर आली होती. मात्र, वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि समयसूचकतेमुळे वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, आणि मयूर पाटील यांनी या महिलेचे प्राण वाचवले.

अटल सेतूवरून आत्महत्येच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. २४ जुलै रोजी एका ३८ वर्षीय व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव श्रीनिवास कुरुकुट्टी असून, ते डोंबिवली येथे राहत होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता. त्याआधी, वरळी सी-लिंकवरून देखील अशाच प्रकारे एका व्यक्तीने आत्महत्या केली होती, ज्याने मुलाला फोन करून आपली निर्णयाची माहिती दिली होती.

मुंबई शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १० जुलै रोजी भाईंदर रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती, जिथे बाप आणि मुलाने अचानक धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.

अशा घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे, आणि मनोविकारतज्ञांनी या समस्येला गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली आहे.

Previous articleस्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र सरकारची मंजुरी; पुणे मेट्रोच्या विस्ताराला मोठा धक्का.
Next articleनागपूर: धोकादायक कसरतीचा प्रयत्न करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मकरधोकडा तलावातील घटना कॅमेऱ्यात कैद.
दर्जेदरनामा डिजिटल न्यूज चॅनल हा आधुनिक बातम्या प्लेटफॉर्म आहे ज्याच्या मुख्य धोरण जगातल्या ताज्या बातम्यांची आणि सूक्ष्मविश्लेषणांची देणगी आहे. त्याच्या समर्पणात वास्तविक रिपोर्टिंग आणि गहन कवरेजवर बल देता, दर्जेदरनामा ह्या चॅनलची उपस्थिती जागतिक घटनांवर, राजकीय घटनांवर, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, आणि इतर विविध विषयांवर ठराव ठेवते. या चॅनलचा उपयोग करून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना वास्तविक वेळेवर अद्यावत आणि बहुमुखी पात्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृढ टीम बातम्यापत्रकारांच्या आणि संवाददात्यांच्या समर्पणाच्या माध्यमातून, दर्जेदरनामा बातम्यापत्रकारीता पत्रकारितेच्या उच्चतम मानकांची रक्षा करतो आणि त्याच्या कामाच्या उच्च मानकांसोबत कड़ी संबंध साधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here