भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये वडील आणि मुलाने धावत्या लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार सकाळी अकरा वाजता घडला. मृतांची ओळख हरीश मेहता (६०) आणि जय मेहता (३०) अशी पटली आहे.
हरीश मेहता आणि जय मेहता यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध वसई रेल्वे पोलिस घेत आहेत. या दु:खद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक लोक आणि प्रवासी या घटनेमुळे हादरले असून, या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी होत आहे. वसई रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे आणि या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.