डॉ. एस. जयशंकर यांनी ११ जून रोजी मोदी ३.० मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटले की, परराष्ट्र मंत्रालयाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा जबाबदारी मिळणे हे अत्यंत सन्मानाचे आहे. पुढील ५ वर्षांत पाकिस्तान आणि चीनबरोबरच्या भारताच्या संबंधांबाबत डॉ. जयशंकर यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि चीनच्या बाबतीत संबंध वेगळे आहेत आणि तेथील समस्याही वेगळ्या आहेत.
पुढे त्यांनी सांगितले की, चीनसंदर्भात आपला मुख्य लक्ष सीमा समस्यांवर उपाय शोधण्यावर असेल आणि पाकिस्तानसंदर्भात वर्षानुवर्षे चालत आलेल्या सीमापार दहशतवादाच्या समस्येवर उपाय शोधण्यावर असेल.