प्राप्त माहितीनुसार, सुधाम दगडू ठोंबरे यांची मुलगी सुहानी तुषार तामणार (वसाहत वि:श्रांतवाडी, पुणे) मंगळवारी (११ जून) दुपारी चुलत बहिणीच्या लग्नासाठी (१२ जून) कसूरडी येथील घरी आली होती.
मंगळवारी दुपारी सुहानीचा भाऊ शंकर सुधाम ठोंबरे पावसाच्या आधी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. घरी काही काम नसल्यामुळे सुहानीही ट्रॅक्टरने भावासोबत संतोजी बुवा मंदिराजवळील त्यांच्या शेतात गेली होती.
शंकरने ट्रॅक्टर बाजूला घेऊन थांबल्यावर सुहानी ट्रॅक्टरवरून उतरून थोडं पुढे चालली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आकाशात विजेचा कडकडाट झाला. त्यावेळी विजेचा तडाखा सुहानीच्या अंगावर पडला. त्यामुळे सुहानी खाली कोसळली आणि जागीच मरण पावली. सुहानीच्या आकस्मिक मृत्युमुळे कसूरडीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.