Home Breaking News पुणे “सराईत वाहन चोराला खडक पोलिसांकडून अटक, 7 दुचाकी जप्त”

पुणे “सराईत वाहन चोराला खडक पोलिसांकडून अटक, 7 दुचाकी जप्त”

117
0

पुणे () : पुणे शहरात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 35 हजार रुपये किमतीच्या यामाहा एफझेड, होंडा स्प्लेंडर, पॅशन अशा महागड्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई भांडे आळी, रविवार पेठ येथे करण्यात आली.

गोवर्धनप्रसाद ललवा साहु (वय 35, राहणार किष्कींदानगर, पौड रोड, कोथरुड, मूळ रा. भोडसा, पोस्ट कौडीया, ता. चदिया, जि. उमरीया, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चोरांचा शोध घेण्यासाठी खडक पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार हर्षल दुडम, प्रमोद भोसले व अक्षयकुमार वाबळे यांना माहिती मिळाली की राष्ट्रभुषण चौकातून बजाज पल्सर (MH 12 GH 9178) चोरणारा भांडे आळी, रविवार पेठ येथे थांबला आहे.

पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पल्सर बाबत चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशीदरम्यान त्याने राष्ट्रभुषण चौकातील एका केकच्या दुकानासमोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याच्याकडून सात दुचाकी जप्त करून खडक पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर इतर गुन्हे उघड करण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, अजीज बेग, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here