पुणे : मालक गावाला गेल्यानंतर बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न नोकरांच्या प्रसंगावधानामुळे फसला. चोरट्यांनी तिजोरी ओढून नेत असताना नोकरांनी त्यांना बंगल्यात कोंडून ठेवले. चांदणी चौक परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन दरोडेखोरांना ताब्यात घेतले. पकडलेल्या चोरट्यांचे प्राथमिक तपासात आईस्क्रीम विक्रेते असल्याचे निष्पन्न झाले आहे. पकडण्यात आलेले चोरटे आईस्क्रीम विक्री करणारे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चांदणी चौक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ कलासागर नावाची सोसायटी आहे. याच सोसायटीत केटरींग व्यावसायिक पुरोहित राहायला आहेत. त्यांच्या घरी नोकर राहायला आहेत. कामानिमित्त पुरोहित कुटुंबीय गावी गेले होते. गुरूवारी दुपारी तिघेजण अचानक घरात शिरले. त्यातील एकाने नोकरांना धाक दाखविला घरातील तिजोरी कोठे ठेवली आहे, अशी विचारणा केली.