मेट गाला 2024 मधील आलिया भट्टचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. लोकांमध्ये तिच्या ड्रेसची चर्चा सुरु आहे. काही नेटकरी त्या संबंधीत काही वेगवेगळे फॅक्ट्स सांगत आहेत. जिथे चाहत्यांचा दावा आहे की आलिया भट्टनं रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणच्या लूकपासून इन्स्प्यार आहेत.
आलिया भट्टचा मेट गाला लूक समोर आला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या ग्लोबल इवेंटमध्ये आलिया भट्टनं रेड कार्पेटवर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. वेस्टर्न लूक न घेता आलियानं पारंपारिक लूक घेतल्यानं सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.