Home Breaking News पुणे महापालिका आयुक्तांचे कडक आदेश!!!!! बावधन परिसरातील पाणी टंचाई प्रश्नांची...

पुणे महापालिका आयुक्तांचे कडक आदेश!!!!! बावधन परिसरातील पाणी टंचाई प्रश्नांची दखल घेतली

120
0

सदरचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून पाण्यासाठी प्रभाग १० बावधन – कोथरूड परिसरातील नागरिकांनी लाखो रुपये टँकरवर खर्च होत असल्याची माहिती आमदार भिमराव अण्णा तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त साहेब आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. पाहणी दरम्यान आमदार मा.श्री.भिमराव अण्णा तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याबाबत पुणे मनपा आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली असता यावर आयुक्तांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील तसेच चांदणी चौक येथील टाकीमध्ये आवश्यक पाणी पातळी कायम ठेवण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले. पाण्यासाठी या रहिवासी इमारतींनी खूप सहकार्य करून देखील अत्यंत कमी दाबाने व अत्यंत कमी पाणी मिळते आहे. बावधन आणि कोथरूड परिसरात बहुतांश सोसायट्यांना पाण्याचे मीटर असून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक कृती आणि उत्तरे आजपर्यंत मिळाली नाहीत. सदर पाणी प्रश्न इतका गंभीर आहे की येथील रहिवासी इमारतींना हक्काने टँकर देखील मिळाला नाही, एवढा अन्याय होऊन देखील येथील नागरिकांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्यच केले आहे. पाण्याच्या या गंभीर प्रश्नाबाबत नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या कार्यालयाकडून पाणी पुरवठा विभाग, पुणे मनपा, कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केला गेला. या परिसराला मागील ६ ते ८ महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून देखील या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. येथील रहिवासी नागरिक नियमित कर भरत असून देखील अश्या प्रकारे पाण्यासारख्या मुलभूत गोष्टीपासून ते वंचित राहिले. बावधन आणि कोथरूड मधील काही विशिष्ट भागाला पाणी पुरवठा करणारी टाकी चांदणी चौकात असून देखील या परिसराला हक्काचे पाणी मिळाले नाही. तसेच वूड्स रॉयल परिसरातील सोसायट्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्पुरते बुस्टर लाऊन पाणी पुरवठा करण्याचे व त्या परिसराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र टाकी बांधण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना Isn’t भिमराव अण्णा तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या सूचनेनुसार आयुक्तांनी संबंधितांना दिले.

Previous article*पुणे महापालिकेची कर्वेनगर भागात नवीन पाण्याची लाईन विकसित;
Next articleEPFO: पीएफ खातेदारांसाठी खुशखबर…
अधिकाधिक सकारात्मक माहितीचा प्रसार करणे. सामाजिक हिताचे सदैव भान राखणे. यादृष्टीने पत्रकारितामध्ये नवीन ओळख निर्माण करणे याकरिता 'लोकदर्शन' हा साकारात्मक लोकजागर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here