Home Breaking News पुणे महानगरपालिका च्या वतीने थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता...

पुणे महानगरपालिका च्या वतीने थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता ‘या’ कालावधीत सर्व वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…….

210
0

पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत घोरपडी, बी.टी. कवडे रोड, थोपटे चौक येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रेल्वे लाईन वरील लोखंडाचे गर्डर लाँच करण्यासाठी थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद (Road Closed) करण्यात येणार आहे. 6 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या दरम्यान हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. (PMC) पर्यायी मार्ग*

थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांनी, बी.टी. कवडे रोडवरील स्मार्ट पॉईंट/वनराज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (बी.जी. शिर्के कंपनी गेट क्र.1) म्हणजेच वठारे मळा रस्ता या पर्यायी मार्गाचा वापर करवा.

पर्यायी मार्ग हा केवळ दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला यांनी कळवले आहे.

Previous articleपुणे पोलीस आयुक्तांची 93 वी बेधडक कारवाई…… भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
Next articleपुणे पोलीस आयुक्तांकडून 107 व्या संघटित टोळ्यांवर कारवाई मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या मंगेश तांबे टोळीवर ‘मोक्का’!
अधिकाधिक सकारात्मक माहितीचा प्रसार करणे. सामाजिक हिताचे सदैव भान राखणे. यादृष्टीने पत्रकारितामध्ये नवीन ओळख निर्माण करणे याकरिता 'लोकदर्शन' हा साकारात्मक लोकजागर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here