कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारुची विक्री करुन दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार भिमय्या लिंगय्या भंडारी (वय- 23 रा. कानडेनगर, उंड्री, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 91 वी कारवाई आहे. भिमय्या भंडारी हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारुचा साठा करुन त्याची विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील दोन वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. कोंढवा परिसरात हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.